POK मधील JKLF संघटनेनं पाक सेनेचा केला ‘पर्दाफाश’, आब्रूच वेशीला टांगली !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. तो म्हणजे, पाक व्याप्त काश्मीर (POK) मध्ये कार्यरत जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) या संघटनेचे नेते हक नवाज खान यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून पाकिस्तानी सैन्याचा पर्दाफाश केला. पाकिस्तान नेहमीच असा दावा करतो कि , त्याच्या कब्ज्यात असलेल्या POK (पाकव्याप्त काश्मीर) मध्ये सर्व काही ठीक आहे. तसेच पाकचा हा दावा करतो कि, तो कधीही युद्ध बंदीचे उल्लंघन करत नाही. आता मात्र पाकिस्तानी सेनेचा दुष्ट चेहरा आणि त्यांच्या सरकारच्या खोट्या दाव्यांचा पर्दाफाश केला आहे.

हक यांनी व्हिडीओ मध्ये म्हटले आहे कि, अखनूर पासून लीपावेलीपर्यंत जेवढ्याही वेळेस गोळीबार झाला आहे. त्यात ९० टक्के प्रकरणात पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन केले गेले आहे.

पाक सैन्यच करत असते कुरापत
हक सांगितल्यानुसार पाकिस्तानी सेना सकाळी-सकाळी २-३ गोळे डागून गप्प बसते आणि मग भारतीय सेनेच्या उत्तरादाखल केलेल्या कारवाईत स्थानिक लोक मारले जातात. ताबा रेषेजवळ (Line of control) राहणारे लोक पाकिस्तानी सैन्याच्या या वृत्तीने रागावले आहेत. परंतु , भीतीमुळे ते काही बोलू शकत नाही. नेहमी पाक सैन्यच कुरापती करत असते. सामान्य लोकांना त्याचा त्रास होत असतो.

आरोग्यविषयक वृत्त –