यंदा बैलांऐवजी ठरला ‘राजकीय पोळा’ !

नेवासा (अहमदनगर) : पोलीसनामा ऑनलाईन – सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील बैल पोळा सण नेवासा तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्साहावर दुष्काळाचे सावट असले तरी अगामी विधानसभेची चाहुल दिसून आली. बैलांना रंगवताना राजकीय पक्षांची चिन्हे व नेत्यांची नावे टाकली होती. हा अनोखा बैलपोळा बैलांचा होती की राजकीय, अशी चर्चा सुरू झाली आहे.
Pola-Festival

या वर्षी दुष्काळाचे सावट आसताना येथील शेतकऱ्यांनी आपल्या बैलांची सजावट करून विधिवत पूजा केली. नेवासा तालुक्यात पोळा सण उत्साहाने साजरा करण्यात आला. दोन दिवसापासून चांगला पाऊस पडत असल्याने शेतकरी समाधानी झाला आहे.

राज्यात आगामी विधानसभेची चाहूल लागली आहे, यात नेवासा तालूका मागे कसा असेल? राजकीय नेते प्रचारात दंग असताना कार्यकर्ते त्यापेक्षा आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. अनेक उत्साही कार्यकर्त्यांनी बैल सजवतांना आपल्या नेत्याचा जोरदार प्रचार केला आहे. यामध्ये भाजपा आमदार मुरकुटे (जय हरी), माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी पक्ष, तर एकावर घड्याळाचे चिन्ह दिसून आले. असे चित्र तालुक्यातील विविध ठिकाणी पाहायला मिळाले. यामुळे आगामी विधानसभेची निवडणूक किती रंगतदार होईल, याची प्रचती येते.
Pola-Festival

सध्या तालुक्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना आज बैल पोळ्याच्या सणानिमित्त नेवासा बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी मोहनराव कुटे पाटील यांनी चक्क क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे मा. आ. शंकरराव गडाख पाटील यांचा प्रचार म्हणून कुटे पाटील यांनी आपल्या बैलाच्या पाठीवर ‘आमचा निर्धार शंकराव गडाख आमदार’ असे लिहिलेले असल्याने हा बैल मिरवणुकीत अनेकांचे लक्ष वेधून घेत होता.

आरोग्यविषयक वृत्त –