Raigad News : पोलादपूरमध्ये वऱ्हाडाचा ट्रक 300 फूट दरीत कोसळला; 4 ठार, 22 जखमी

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन –   रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात वऱ्हाडाच्या ट्रकला भीषण अपघात (Raigad accident) झाला आहे. हा ट्रक थेट 300 फूट दरीत कोसळला असून 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 20 ते 22 जण जखमी झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. मदतकार्यासाठी डॉक्टरांचे एक पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे.

पोलादपूर तालुक्यातील दुर्गम कुडपण धगरवाडी जवळील वळणावर वऱ्हाडाच्या ट्रकला हा अपघात झाला. या ट्रकमधून जवळपास 25 जण प्रवास करत असल्याचे समजतय. वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रक दरीत कोसळला. या अपघाताची माहिती मिळताच महाडचे जवान मदत कार्यासाठी रवाना झाले आहेत.

महाडची रेस्क्यू टीमही घटनास्थळी रवाना झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. काल महाड तालुक्यात आकले गावाजवळ वऱ्हाडाची बस पलटी झाली होती. त्यामध्ये 15 जखमी झाले होते. त्यानंतर आज पोलादपूर तालुक्यात कुडपन जवळ ट्रक दरीत कोसळला आहे.