Police Accident News | उभ्या ट्रकला धडकल्याने पोलिसचा दुर्देवी मृत्यू

मानवत : पोलीसनामा ऑनलाइन – Police Accident News | नॅशनल हायवेवर रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या ट्रकला मोटारसायकलची धडक बसल्याने झालेल्या अपघातात पोलिस कर्मचार्याचा मृत्यू झाला (Parbhani Crime News). ही घटना मंगळवारी (दि. 14) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास येथील स्वामी समर्थ जिनिंग समोर घडली आहे. (Police Accident News)
सुधाकर रामकिशन कणके (52) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पोलिस कर्मचार्याचे नाव आहे. कणके हे परभणी पोलिस मुख्यालयात (Parbhani Police) हवालदार म्हणून कार्यरत होते. सध्या ते पाथरी येथे रहावयास होते. मंगळवारी रात्री ते परभणी येथुन पाथरीकडे मोटारसायलवरून जात असताना शहराबाहेरील स्वामी समर्थ जिनिंग समोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला ते धडकले.
अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सुधाकर कणके यांचे भाऊ सुरेश कणके यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून यासंदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Web Title :- Police Accident News | parbhani policeman dies after motorcycle collides with stationary truck near Manwath
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Dhankawadi, Pune News | नॅशनल चॅम्पियन जिमनँस्ट साहिल मरगजेचा महर्षी व्यास प्रतिष्ठानच्या वतीने गौरव
Back Pain चा किडनीशी आहे जवळचा संबंध, जाणून घ्या – पाठीत कुठे वेदना असतील तर असू शकतो मोठा आजार
Dhankawadi, Pune News | नॅशनल चॅम्पियन जिमनँस्ट साहिल मरगजेचा महर्षी व्यास प्रतिष्ठानच्या वतीने गौरव