म्हणे… एन्काऊंटर चुकीचा, पोलिसांवर FIR दाखल करा

हैदराबाद : पोलीसनामा ऑनलाइन – हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. परंतू पोलिसांकडून करण्यात आलेल्या या एन्काऊंटरनंतर देशातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी पोलिसांच्या या कारवाईचे कौतूक केले तर काहींनी ही चुकीची पद्धत असल्याचे म्हणले. सर्वोच्च न्यायालयाच्या वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या वृंदा ग्रोवर यांनी देखील या एन्काऊंटरवर आक्षेप नोंदवला आहे.

वृंदा ग्रोवर यांनी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पुढे सांगितले की, हे एन्काऊंटर कायद्याला धरुन नव्हते. या सर्व प्रकरणाची स्वतंत्र न्यायालयीन तपासणी व्हावी. महिलांच्या नावावर पोलिसांनी एन्काऊंटर करणे चुकीचे आहे.

हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी घटनास्थळी तपासासाठी नेले होते. तेव्हा आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर केलेल्या गोळीबारात आरोपी ठार झाले.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी देखील यावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्या म्हणाल्या की एन्काऊंटर प्रत्येक वेळी व्यवस्थित आणि सत्य असतील असे नाही. मारले गेलेले आरोपी पोलिसांकडील शस्त्र घेऊन पळत होते आणि त्यांनी पोलिसांवर हल्ला केल्याचे सांगितले जाते परंतू यात संशयास जागा आहे.

उज्ज्वल निकम यांनी हैदराबाद पोलिसांची केली चंबळच्या डाकूंशी तुलना –
उज्ज्वल निकम म्हणाले की मुळात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींच्या हातात बेड्या असतात. त्या असतानाही त्यांनी शस्त्र हिसकावून घेतली असं गृहित धरलं तरी हा गोळीबार योग्य नव्हता. झटपट न्याय मिळाल्यानंतर आनंद होणे स्वाभाविक आहे. पण तसा न्याय चंबळचे दरोडेखोरही द्यायचे. पण शेवटी ते दरोडेखोरच होते.

अंजली दमानिया म्हणाल्या चकमक करण्याची ही चुकीची पद्धत –
सध्या द्विधा मनस्थिती आहे, बलात्कारी ठार झाल्याचा आनंद आहेच परंतू कायदेशीर मार्गाने फाशी व्हायला हवी होती. चकमक करण्याची पद्धत चूकीची आहे.

काय आहे प्रकरण –
पोलिसांनी माहिती दिली की हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना तपासासाठी घटनास्थळी नेण्यात आले होते. आरोपींनी पोलिसांवर हल्ला करुन तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. ते चौघे पळून जाण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला त्यात आरोपी ठार झाले असे सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी सांगितले.

काय होती घटना –
हैदराबादमध्ये एका डॉक्टर महिलेचा बलात्कार आणि हत्येचे प्रकरण समोर आले होते. यानंतर या घटनेतील चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींची चौकशी सुरु असताना अनेक धक्कादायक खुलासे समोर आले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like