विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवल्याने पोलिसांची कारवाई

अलिबाग : पोलीसनामा आॅनलाइन

दीड दिवसाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन झाले. याप्रकरणी कारवाई करत अलिबाग पोलिसांनी डीजेचे साहित्य, टेम्पो आणि जनरेट असा ९ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गणेशोत्सवात डीजे लावण्यास बंदी घालण्यात आली होती. तरीही डीजे लावल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’80729249-b8ba-11e8-8899-c9d48c37cf6b’]

अलिबाग शहरातील तळकर नगर येथे राहणारे संतोष जाधव यांनी दीड दिवसांच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक काढली होती. यावेळी ध्वनी प्रदूषण पथक हे ब्राम्हण आळी ते रामनाथ येथे पेटड्ढोलिंग करत होते. त्यावेळी जाधव यांच्या गणरायाच्या मिरवणुकीत डीजेसारखे ध्वनी प्रदूषण वाद्य मोठ्या कर्कश आवाजात वाजविले जात असल्याचे निदर्शनास आले. यानंतर या पथकाने डीजेची ध्वनी तीव्रता यंत्राने तपासणी करुन प्रिंट काढली असता ती ६३.३ डेसीबल एवढी इतकी भरली.

दोन दिवसांच्या चिमुरडीला रुग्णालयाबाहेर सोडून आई फरार 

ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संतोष जाधव,  डीजे चालक रोहित सुरेश पाटील, वाहन चालक स्वप्नील दिलीप लिंगम, जनरेटर चालक उत्कर्ष विकास चवरकर यांच्या विरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ नुसार ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण नियम २००० अन्वये अलिबाग पोलिसांनी कारवाई केली आहे.