वाळूच्या वाहनांवर पोलिसांची कारवाई

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरूर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन हायवा वाहनांवर पोलिसांनी कारवाई करत ४० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड चे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांना शिरुर तालुक्याच्या अण्णापुर हद्दीत अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या पथकातील पोलिस नाईक दिपककुमार वाईकर, धनंजय गाढवे,अमोल गवळी यांनी कारवाई करत एम. एच.१२ एन. टी ४८५२ व एम. एच १२ क्यू. जी.१००१ या दोन हायवा ट्रक ना ताब्यात घेत दोन्ही ट्रक व १० ब्रास वाळू असा एकूण सुमारे ४० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी चेतन राजकुमार परदेशी व माणिक अमरसिंग राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एकीकडे पोलिस वाळूमाफियावर कारवाई करत असताना दुसरीकडे माञ महसुल विभागमाञ सुस्त असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

You might also like