अबब ! गँगस्टर विकास दुबेकडे ‘एवढी’ संपत्ती, 3 वर्षात तब्बल 10 देशांचा दौरा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : गँगस्टर विकास दुबेच्या एन्काउंटरनंतर अनेक धक्कादायक गोष्टी अशा बाहेर आल्या आहेत. गेल्या 30 वर्षांपासून उत्तर प्रदेशमध्ये धुमाकूळ माजवणारा हा गुंड गुरुवारी पोलिसांबरोबरच्या चकमकीत ठार झाला. त्याच्या मृत्यूनंतर आता त्याच्यासंबंधी बर्‍याच गोष्टी समोर येत आहेत. खंडणी, खून, अपहरण, ब्लॅकमेलिंग, राजकारण, काळा व्यापार आणि इतर बर्‍याच प्रकारांतून त्याने गेल्या तीन दशकांत अफाट संपत्ती जमवली आहे. सध्या पोलिस त्याच्या काळ्या मालमत्तेविषयीची माहिती गोळा करण्यात व्यस्त आहेत.

गुंडांची मोठी टोळी विकास दुबेने तयार केली होती आणि आपली दहशत निर्माण केली होती. या दहशतीद्वारे त्याने अफाट पैसा गोळा केला आहे. तसेच गेल्या 3 वर्षात त्याने आणि त्याच्या टोळीतील सहकाऱ्यांनी 10 पेक्षा जास्त देशांचा दौरा केला असल्याचे देखील समोर आले आहे. दुबई, थायलंड आणि इतर काही देशांमध्येही त्याने कोट्यवधींची गुंतवणूक केल्याची माहिती आहे. नुकताच त्याने लखनऊमध्ये 20 कोटींचा बंगला विकत घेतला असल्याचे देखील समजले आहे. पोलिस आता त्याच्या अन्य सहकाऱ्यांकडून सर्व माहिती गोळा करीत आहेत आणि सर्व अवैध मालमत्ता जप्त करणार आहेत.

कानपूरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक दिनेशकुमार पी म्हणाले की, सकाळी हा अपघात झाला. “जोरदार पाऊस पडत होता,” तो म्हणाला. पोलिसांनी दुचाकीला धडक दिल्याने वाहन पलटी झाले आणि वाहनातील पोलिस जखमी झाले. संधीचा फायदा घेत दुबे यांनी पोलिस कर्मचा .्याची पिस्तूल हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्याला शरण जाण्यास सांगितले. पण विकासने गोळीबार केल्यानंतर त्याला गोळ्या घालण्यात आल्या.