अवैध संपत्‍ती गोळा केल्यानं पोलिसासह पत्नी ‘गोत्यात’, एसीबीकडून FIR

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – अवैध संपत्ती गोळा केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस दलात नोकरीला असताना त्यांनी हि अवैध संपत्ती गोळा केली होती. 22 लाख, 32 हजार 295 रुपये इतकी अवैध संपत्ती गोळा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

रमेश किसन आवटे वय 40 असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्याची पत्नी दिपाली रमेश आवटे वय 35 या दोघांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. विविध प्रकरणात लाच घेण्यासाठी आपल्या पतीवर दबाव टाकल्याचा आरोप या पोलिसाच्या पत्नीवर करण्यात आला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने विविध विभागांत काम केले आहे. मात्र त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर त्याला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध संपत्ती आढळून आली.

दरम्यान, पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले असून ही सर्व संपत्ती पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Visit : policenama.com