डीएसकेंच्या जवळच्या 3 नातेवाईकांना पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

पुण्यातील सुप्रसिध्द बिल्डर डीएसके कुलकर्णी यांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे. पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी डीएसके यांच्या जवळच्या 3 नातेवाईकांना अटक केली आहे.

केदार वांजपे, सई वांजपे आणि धनंजय पाचपोर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यापुर्वी गुंतवणुकदारांची फसवणुक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना पोलिसांनी दिल्‍ली येथुन अटक केली होती. अटक केल्यानंतर डीएसके ससून आणि खासगी रूग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. डीएसके यांनी जामिन मिळावा म्हणुन न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो अर्ज फेटाळला. अगदी आठवडयाभरापुर्वी डीएसके आणि त्यांच्या पत्नीचे कारागृहातील फोटो व्हायरल झाले होते. बुधवारी सायंकाळी आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्‍त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी डीएसकेच्या 3 जवळच्या नातेवाईकांना अटक केली. केदार वांजपे हे डीएसकेंच्या भावाचे जावाई असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.