ससून मधून पळालेल्या ‘त्या’ आरोपीच्या मुसक्या आवळल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ससूनमध्ये उपचारासाठी आणल्यानंतर पोलिसांना गुंगारा देऊन पळालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. बंडगार्डन परिसरात मित्राला भेटण्यासाठी आल्यावर त्याला सापळा रचून पोलिसांनी अटक कली आहे.

पुरुषोत्तम उर्फ संजय वसंत नलावडे (२० वर्षे, सिंहगड रोड, पर्वती पायथा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

मुलीला पळवून नेल्याप्ररणी सहकार नगर पोलिसांनी संजय नलावडे याला अटक केली होती. त्यानंतर त्याला जानेवारी महिन्यात तो पोलीस कोठडीत असताना त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात आणण्यात आले. त्यावेळी पोलिस कर्मचारी कागदपत्रे तयार करण्यात मग्न असल्याचा डाव साधून त्याने तेथून पळ काढला होता.

पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या कार्यालयात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र होनराव व पोलीस हवालदार भोंग आणि शिंदे यांना माहिती मिळाली की संजय नलावडे हा बंडगार्डन येथील साधु वासवानी चौकात मित्राला भेटण्यासाठी येणार आहे. त्यानुसार त्यांनी तेथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केल्यावर तो ससूनमधून पळून गेला होता. त्यानंतर त्याने कर्नाटकामध्ये काही काळ वास्तव्य केले आणि काल मित्राला भेटण्यासाठी तो पुण्यात आला होता. त्याला बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, परिमंडल २ चे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. जे. होनराव, पोलीस हवालदार भोंग व शिंदे यांनी ही कारवाई केली.