जिल्हाधीकारी कार्य़ालयासमोरील आंदोलकांवर पोलिसांचा साैम्य लाठीचार्ज

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन

मराठा आरक्षणासाठी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली होती. हा बंद शांतता, अहिंसेच्या मार्गाने करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केले होते. मात्र, समन्वयाकांच्या आव्हानाकडे दुर्लक्ष करुन सायंकाळी सहा नंतर देखील आंदोलन सुरु ठेवण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या आंदोलनातील ४० आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी करण्यात आलेल्या साैम्य लाठीचार्ज मध्ये दाेन आंदाेलनकर्ते जखमी झाले असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहेत.
[amazon_link asins=’B077PWK5QD’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’49f0364d-9be7-11e8-8679-4fb0a2cc2720′]

आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिल्यानंतर आंदोलकांनी जिल्हाधीकारी कार्यालयाची तोडफोड केली. त्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण झाले. आंदोलक सायंकाळचे सात वाजले असतानाही जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर थांबले होते. पोलिसांकडून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, आंदोलक ऐकत नसल्याने अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरुन काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

 

You might also like