यवत पोलिसांना ‘वॉन्टेड’ असलेला ‘गुन्हेगार’ लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात

लोणी काळभोर : पोलिसनामा ऑनलाइन – यवत पोलिस स्टेशन गुन्ह्यातील फरारी महिला वाघोली येथे भारत पेट्रोलपंपाजवळ आली असल्याचे नातेवाईकांकडून बातमी मिळाल्याने ठिकाणी महाशिवरात्रीच्या बंदोबस्तावर असलेल्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस हवालदार बाळासाहेब सकाटे, ऋषिकेश व्यवहारे, आशा इटनर, प्रतीक्षा पानसरे यांनी स्वतः जाऊन याची खात्री केली असता या ठिकाणी ती महिला मिळून आली. तिच्याकडे अधिक विचारपूस केली असता तिने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर तिला पोलीस स्टेशन मध्ये आणून तिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने तिचे नाव आशा राजू लोणकर वय 49 वर्षे रा. मु पो दावडी, लोणकर वस्ती, ता. खेड, जि पुणे असे सांगून ती आणखी वेगवेगळ्या नावाने राहत असून सदर गुन्हयाची कबुली दिली आहे. या महिलेने लग्नासाठी मुलगी दाखवते म्हणून त्यांना विश्वासात घेवून त्यांचेकडून साडेचार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र वापरण्यासाठी घेऊन आज परत देते उद्या परत देते अशी टाळाटाळ करून विश्वासघात करून एकूण 90,000/- रु किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्राचा अपहार केलेबाबत गुन्हा दाखल आहे. सदर महिलेने अश्याप्रकारे बऱ्याच लोकांना फसवले असलेबाबत दाट शक्यता आहे. महिल

कामगिरी सदर कामगिरी ही उप विभागीय पोलीस अधिकारी हवेली विभाग सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी तपास पथक- पोलीस उप निरीक्षक हणमंत पडळकर, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाणे, दत्ता काळे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, सुरज वळेकर, आशा इटनर, प्रतीक्षा पानसरे यांनी केली आहे.