ब्लॅकमेल करून खंडणी मागितली, मिरजेतील काँग्रेसच्या माजी नगरसेवकास अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – मिरजेतील प्रसिद्ध रहमतुल्ला हॉटेलचे मालक मेहबुब तहसिलदार यांची अश्लिल चित्रफीत काढून त्यांना बदनामी करण्याची धमकी देवून ब्लॅकमेल करत खंडणी मागितल्या प्रकरणी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक व विद्यमान पदाधिकारी अय्याज नाईकवडी याला अटक करण्यात आली. नायकवडी याच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मक्सूद जमादार, मकसुद भोकरे, कामील बागवान, अक्रम काझी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

मेहबुब तहसिलदार यांची अश्लिल चित्रफित काढण्यात आली होती. अय्याज नायकवडी यांनी तहसिलदार यांना फोन करून तुमची अश्लिल चित्रफित आहे. याबाबत चर्चा करायची आहे असे सांगून तहसिलदार नायकवडी यांच्या कार्यालयात गेले. तहसीलदार यांना अश्लिल चित्रफित दाखविली. त्यावेळी अय्याज नायकवडी, मक्सुद भोकरे, मक्सुद जमादार उपस्थित होते. त्यावेळी अय्याज नायकवडी यांनी तहसिलदार यांना बदनामीची धमकी देवून ५ लाख रूपये त्यांच्याकडून घेतले.

त्यानंतर काही दिवसांनी अय्याज नाईकवडी यांनी फोन करून पुन्हा त्याच ऑफिसमध्ये बोलावून घेतले. त्यावेळी कामील बागवान, अक्रम काझी असे दोन नवीन इसम होते. त्यांनी तहसिलदार यांना माझ्याकडेही अश्लिल चित्रफित असून आम्ही व्हायरल करू अशी धमकी दिल्यानंतर त्यांनी ५ लाख रूपये दिले असे एकूण १० लाख रूपये त्यांना दिले. त्यानंतर काही दिवसांनी परत आणखीन ५ लाखांची मागणी करून अश्ल्लिल चित्रफित व्हायरल करून बदनामीची धमकी देत होते. वारंवारच्या त्रासाला कंटाळून अखेर तहसीलदार यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी अय्याज नायकवडी, मक्सूद भोकरे, मक्सूद जमादार, कामील बागवान, अक्रम काझी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Visit : Policenama.com