पैशांसाठी केला बॅंक ऑफ इंडीयाच्या माजी डायरेक्टरचा खून, चार तरुण अटकेत

चतुश्रृंगी पोलिसांनी केली अटक

पुणे : पोलीनसामा ऑनलाईन – औँध मधील उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या बॅंक ऑफ इंडीयाचे माजी एक्झीक्यूटीव डायरेक्टर असलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा काही अज्ञातांनी काही दिवसांपुर्वी खून करण्यात आला होता. या खुनाचा उलगडा करण्यात चतुश्रृंगी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार युवकांना अटक केली असून त्यांनी लुटीच्या उद्देश्याने त्यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यातील एकजण त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेचा मुलगा आहे.

गणेश पंढरीनाथ जातेगावकर (वय. ८४, रा. ब्लॉसम सोसायटी औंध) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कृष्णा देवेंद्र बडेकर (वय २४, रा. राजीव गांधी झोपडपट्टी खडकी),  सैफ अली बाबूजी शेख (वय २२, रा. पवार वस्ती दापोडी), नदीम सलीम पठाण (२४, रा. दापोडी), मोसिन अकबर सय्यद (वय ३०, रा.  इलेवनसिटी दापोडी पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध येथील ब्लॉसम सोसायटीमधील फ्लॅटमध्ये गणेश जातेगावकर यांचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला होता. याप्रकरणी चतुश्रंगी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद पोलिसांनी केली होती. गणेश जातेगावकर हे बँक ऑफ इंडियाचे एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर होते. दरम्यान त्यांचे अॅक्सिस, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँकेचे एटीएम, डेबिट कार्ड चोरीला गेल्याचे व त्यावरून पैसे काढण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून कुणीतरी त्यांचा लुटीच्या उद्देशाने खून केला असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकऱणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्यांच्या खात्याची व त्याच्या व्यवहारांची माहिती पोलिसांनी मिळवली. तेव्हा लोणावळा, वरळी, मुंबई,  पनवेल या ठिकाणाहून व्यवहार झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी एटीएम तसेच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पैसे काढणाऱ्यांच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून कृष्णा देवेंद्र बडेकर, सैफ अली बाबूजी शेख, नदीम सलीम पठाण, मोसिन अकबर सय्यद  या चौघांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांनी जातेगावकर यांचा खून केल्याची कबूली दिली.

आले लुटण्यासाठी परंतु ओळखत असल्याने केला खून

अटक केलेल्या कृष्णा बडेकर याची आई गणेश जातेगावकर यांच्या घरी काम करत होती. त्यामुळे कृष्णाचेही येथे येणे जाणे होते. दरम्यान त्याने जातेगावर यांच्या फ्लॅटची डुप्लीकेट चावी तयार केली. त्यानंतर या चावीचा वापर करून कृष्णा व त्याचे साथीदार त्या दिवाशी घरात घुसले. त्यांनी जातेगावकर यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. परंतु त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी कोयत्याच्या धाकाने त्यांचे एटीएम कार्ड घेऊन त्याचा पीनही विचारून घेतला. परंतु आपली आई इथे काम करते. जातेगावकर आपल्याला ओळखतात. आपण पकडले जाऊ या भीतीने कृष्णा बडेकर व मोसिन सय्यद यांनी गणेश जातेगावकर यांचे हात पकडून नदीम शेख याने गणेश जातेगावकर यांच्या तोंडावर उशी दाबून त्यांचा खून केला.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, सहाय्यक पोलीस आयुक्त देवीदास पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस निरीक्षक गुन्हे वैशाली गलांडे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम फड, पोलीस नाईक सारस साळवी, प्रकाश आव्हाड, ज्ञानेश्वर मुळे, पोलीस हवालदार प्रदिप खळदकर ,बाळू गायकवाड एकनाथ जोशी ,मुकुंद तारू, दादासो काळे, अजय गायकवाड, विशाल साबळे, तेजस चोपडे, अमर शेख यांनी केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like