कोंढवा पोलिसाकडून पिस्तूल बाळगणाऱ्यास अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बेकायशीर पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. अश्रफ जावेद शेख (वय 24, रा-भाग्योदय नगर, कोंढवा खुर्द) असे अटक केल्याचे नाव आहे.

याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस हद्दीत तसेच हॉटस्पॉट असणाऱ्या परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी कर्मचारी पवार याना बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, एकजण पिस्तूल घेऊन येणार आहे. त्यानुसार पथकाने या ठिकाणी सापळा रचून शेख याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ एक विदेशी बनावटीची पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळाली. ही कारवाई परिमंडळ पाचचे सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मुरलीधर करपे तपास पथकाचे सहायक निरीक्षक चेतन मोरे, उपनिरीक्षक संतोष शिंदे, कर्मचारी शेख, पो ना कुंभार,पाडुळे पो शी. अझीम शेख, किशोर वळे, उमाकांत स्वामी यांच्या पथकाने केली.

Visit :  Policenama.com