चरसची तस्करी करणारा Wanted गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

मीरारोड : पोलीसनामा ऑनलाईन –   मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं भाईंदर पूर्वेला सापळा रचून 2 किलो चरससह दोघांना पडकल्यानंतर नवघर पोलीस सक्रिय झाले आहेत. या गुन्ह्यातील वॉन्टेड असलेल्या आरोपी तस्करास पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई पोलिसांच्या पथकानं 15 सप्टेंबर रोजी भाईंदर पूर्वेला गोपीनाथ मुंडे क्रिडा संकुलाजवळ सापळा रचून अविनाश सिंह (24) व श्रवण गुप्ता (38) या दोघंना 2 किलो चरससह अटक केली होती. हे दोघेही आरोपी नाला सोपारा येथील होते. त्यांनी सदर चरस ही भाईंदरच्या बलराम उर्फ बल्ली यादव (33) याच्याकडून घेतल्याचं सांगितलं होतं.

नवघर पोलिसांनी या प्रकरणी गुरुवारी रात्री बल्ली यादव याला अटक केली. यादव हा नेपाळ वरून उत्तर प्रदेश-बिहार मार्गे चरस आणत असे आणि इतर मागणी धारकांना पुरवत असे असं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे.

नवघर पोलीस निरीक्षक संपत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोशन देवरे, सहाय्यक उपनिरीक्षक बाळू राठोड, निलेश शिंदे, नवनाथ माने, सुनील ठाकूर आदींनी तपास करून बल्ली यादव याला अटक केली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like