अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील नवनागापूर येथील सह्याद्री चौकात दुचाकी
चोरणारा चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. सुरज शिवाजी शिंदे ( रा.बुरुडगावरोड, आयटीआय काँलेजजवळ, अ.नगर) असे पकडण्यात आलेल्या आरोपीच्या नाव आहे. त्याच्याकडून चोरीच्या सात मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कोतवालीत दाखल गुन्ह्यातील आरोपी सुरज शिवाजी शिंदे हा नवनागापूर येथील सह्याद्री चौकात चोरीची बुलेट दुचाकी विकण्यासाठी येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यानुसार सह्याद्री चौकात पोलिसांनी सापळा लावून सुरज शिंदे याला बुलेटसह ताब्यात घेतले.
विचारपूस केली असता, बुलेट चोरीची असल्याची कबुली दिली. २ लाख रु.राखाडी रंगाची क्लासिक ३५० बुलेट विनानंबर जप्त करण्यात आली. शिंदे यांच्या कडे अधिक चौकशी केली असता, अन्य चोरलेल्या दुचाकी विक्रीसाठी टिळक रोड येथील घराशेजारील मोकळ्या जागेत बारदानेखाली लपवून ठेवलेल्या दुचाकी काढून दिल्या. स.पो.नि. संदीप पाटील, स.फौ. सोन्याबापू नानेकर, पो.ना. रविंद्र कर्डिले, संतोष लोढे, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, पो.काँ. प्रकाश वाघ, राहुल सोळुंके, रणजित जाधव, मच्छिंद्र बर्डे, मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर आदीच्या पथकाने कारवाई केली.
Visit : Policenama.com
- भात खाण्याचे ‘हे’ १० फायदे जाणून तुम्ही व्हाल थक्क ! बिनधास्त करा सेवन
- क्रिस्टिना सिल्वाने ‘मस्कुलर बॉडी’ कशी बनवली ? जाणून घेवूयात रहस्य
- वजन कमी करण्यासाठी ‘हा’ आहे सर्वोत्तम उपाय, जाणून घ्या
- ‘हे’ पदार्थ जास्त खाल्ले तर लवकर होऊ शकता म्हातारे, वेळीच करा उपाय
- भातामुळे वाढत नाही लठ्ठपणा, जाणून घ्या आहारतज्ज्ञ काय सांगतात
- मुलांना लहानपणापासूनच लावा मैदानी खेळांची सवय, उत्तरार्धातही राहतील फिट
- सावधान ! जास्त फळे खाल्ल्याने वाढू शकते वजन, जाणून घ्या कारणे
- गर्भातच मुलाला मिळेल अनुवंशिक आजारातून मुक्तता
- ‘सिक्स पॅक्स अॅब्स’ हवेत का ? मग ‘हे’ सोपे व्यायाम प्रकार आवश्य करा
- पौष्टिक पदार्थांपेक्षाही ‘पाणी’ आहे सरस !