कारवाई दरम्यान पोलिस निरीक्षकाला मारहाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नो-पार्किंग मध्ये पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस निरीक्षकाला मारहाण झाल्याची घटना कांदिवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी तात्काळ दोघांना अटक केली असून ते दोघे भाऊ आहेत.

अहमद मोहम्मद हसन खान (24) आणि सज्जाद अहमद मोहम्मद हसन खान (28) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस निरीक्षक सिताराम शिंदे यांना त्यांनी मारहाण केली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, विभागातील प्रभारी वाहतूक पोलिस निरीक्षक सिताराम शिंदे आणि त्यांचे सहकारी परिसरात अनाधिकृत पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करीत होते. खान यांची देखील गाडी नो-पार्किंगमध्ये पार्क केली होती. पोलिस निरीक्षक शिंदे त्यांच्या गाडीवर कारवाई करीत होते. त्यावेळी अहमद आणि सज्जाद यांनी पोलिस निरीक्षक शिंदे यांच्याशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केला तसेच त्यांना मारहाण देखील केली.

पोलिस निरीक्षकाला मारहाण केल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरूध्द सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा तपास कांदिवली पोलिस करीत आहेत.

Loading...
You might also like