home page top 1

नाकाबंदीवरील पोलीस शिपायाच्या कानशिलात लगावली ; दोघांना अटक

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – नाकाबंदीचे व्हिडिओ शुटींग करणाऱ्यांना अडविल्याने दोघा तरुणांनी पोलीस शिपायाला शिवीगाळ करुन कानशिलात लगावली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. नवीन अनिल डागीर आणि नितीन जयप्रकाश जोगीड (रा. आसमी कॉम्पलेक्स, गोरेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.  हा प्रकार जोगेश्वरी एस. व्ही़. रोडवरील दरबार हॉटेलजवळ गुरुवारी पहाटे घडला.

निवडणुकीच्या निमित्ताने ओशिवरा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी एस. व्ही़. रोडवर नाकाबंदी केली होती. वाहनांची तपासणी करणे, रॅश ड्रायव्हिंग तसेच विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरु होती. त्यावेळी दोन तरुण मोटारसायकलवरुन विना हेल्मेट येताना पोलिसांना दिसले. मात्र, पोलिसांना पाहताच ते पळून जाऊ लागले. यावेळी पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडे लायसन्स आणि मोटारसायकलची कागदपत्रे नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांच्यातील एका तरुणाने मोबाईलवरुन नाकाबंदीचे व्हिडिओ शुटींग करण्यास सुरुवात केली. ते पाहून त्याला पोलिसाने अडविले. तेव्हा त्याने शिवीगाळ करीत त्यांच्या कानशिलात लगावली व त्यांच्या हातातील काठी घेऊन त्यांना दुखापत केली. हा प्रकार लक्षात येताच नाकाबंदीवरील इतर पोलिसांनी दोघांना पकडले.

Loading...
You might also like