IT मधील तरूणींना अन् गर्भ श्रीमंतांच्या मुलींना ‘तो’ हेरायचा, पुण्यात कोटयावधींची चोरी करणार्‍या तरूणाचा पर्दाफाश, 1 कोटी 8 लाख जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  शहरातील व्यावसायिकाच्या घरातून पावणे दोन कोटींच्या चोरीच्या गुन्ह्याच्या छडा लावण्यात यश आले आहे. चोरटा उच्चभ्रू असून, त्याने अश्याप्रकारे अनेकगर्भ श्रीमंत तरुणींना फसविल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून 1 कोटी 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अनिकेत सुरेंद्र बुबणे (वय 30, रा. बालाजीनगर, धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. यापूर्वी व्यावसायिकाच्या नातेवाईक महिलेला अटक केली आहे.

अनिकेत हा उच्चशिक्षित आहे. तो आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणी व श्रीमंत घरातील तरुणीना हेरायचा. डेटींग साईटच्या माध्यमातून देखील तो तरुणींना आपल्या जाळ्यात ओढायचा. त्यांच्याशी ओळख वाढवून नंतर त्यांना ब्लॅकमेल करत. तसेच पैसे किंवा सोने घ्यायचा. बदनामीच्या भितीने अनेक तरुणींनी त्याला पैसे दिले आहेत. पण, त्या तक्रार करण्यासाठी पुढे आलेल्या नाहीत.

अनिकेत आणि नातेवाईक महिलेने घरातील 1 कोटी 74 लाख रुपयांचा ऐवज चोरल्यानंतर पसार झाला होते. पोलिसांनी महिलेला अटक केली. पण अनिकेतचा शोध लागत नव्हता. तो उच्च शिक्षित असल्यामुळे पुरावा सापडणार नाही, याची काळजी घेत होता. त्यामुळे त्याला अटक करण्यास अडचणी येत होत्या. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंग यांनी आरोपींचा माग घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपीचा माग काढला जात होता. त्यावेळी त्याच्या अनेक मैत्रिणीची माहिती मिळाली. त्या मैत्रिणींना अनिकेत याची खरी माहिती सांगून त्यांना विश्वासात घेतले. त्या गोष्टीचा फायदा पोलिसांना झाला. अनिकेतने त्याच्या एका जुन्या मैत्रिणीला फोन केला होता. त्यामुळे तो कोठे राहतो याची माहिती पोलिसांना समजली. त्याच्या मैत्रिणीच्या मदतीने त्याला बाणेर भागात भेटण्यासाठी बोलविले. त्यानुसार शनिवारी सापळा रचून त्याला बाणेर भागात पकडले. त्याच्याकडून 98 लाखांची रोकड जप्त केली आहे.