पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात एकाचा खून करणार्‍या दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ‘जेलमधून आला म्हणून काय भाई झाला का’, असे म्हणत गुन्हेगाराच्या डोक्यात फरशी घालून खुन प्रकरणात पसार झालेल्या दोघांना अलंकार पोलिसांनी अटक केली.

अनिकेत वाखारे व त्याचा साथीदार सागर चवरिया (रा. कोरेगाव पार्क) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेत निलेश उर्फ गोट्या शेडगे याचा खून झाला होता.

निलेश याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याप्रकरणी तो कारागृहात होता. घटनेच्या पंधरा दिवस आधीच तो या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आला होता. दरम्यान आरोपी व ते एकाच परिसरातील आहेत. एकमेकांना ओळखत होते. चार दिवसांपूर्वी चौघेजण मध्यरात्री भेटले होते. त्यावेळी निलेश काही तरी बोलल्यावरून तू काय भाई झाला का असे म्हणत वाद पेटला. तसेच त्याच्या डोक्यात फरशी घालून त्याचा खून केला होता. याप्रकरणी दोघांना अटक केली होती. तर दोघे पसार होते.

त्यांच्या शोध घेतला जात होता. यावेळी अलंकार पोलीस ठाण्याचे हद्दीत दोघेजण येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी लांडगे व चव्हाण यांना मिळाली होती. त्यानुसार याठिकाणी सापळा रचला. त्यावेळी दोघे निंबाळकर पान टपरीजवळ आले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांना पुढील कारवाईसाठी कोरेगाव पार्क पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत.

पश्चिम विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त परिमंडळ तीनच्या पौर्णिमा गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्पना जाधव, पोलीस पोलिस नाईक राजेंद्र लांडगे, चव्हाण, धनवटे, राऊत, जाधव, शिंदे, योगेश बडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/