अहमदनगर : सरपंचाचा खून केल्याप्रकरणी तिघांना अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूरच्या सरपंचाचा खून केल्याप्रकरणी तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. काल रात्री हा खून करण्यात आला होता. अटक केलेल्यांमध्ये ज्ञानेश्वर विष्णू दहीफळे (वय- २८ वर्षे, रा. दैत्य नांदूर, ता- पाथर्डी), राहुल शहादेव दहीफळे (वय- २२ वर्षे), भागवत हरीभाऊ नागरगोजे (वय-५० वर्षे) यांचा समावेश आहे. आरोपींना पुढील चौकशीसाठी पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या पराभवाचे कारणावरुन शहादेव पंढरीनाथ दहीफळे याने संजय बाबासाहेब दहीफळे व गणेश रमेश दहीफळे यांच्यावर गनमधून गोळीबार करुन व इतर आरोपी विष्णू पंढरीनाथ दहीफळे, ज्ञानेश्वर विष्णू दहीफळे, व्दारका भागवत नागरगोजे, विष्णू दहीफळे याची पत्नी, शहादेव दहीफळे याची पत्नी व दोन मुले, ज्ञानेश्वर दहीफळे याची पत्नी, पंढरीनाथ दहीफळे, अनिकेत भागवत नागरगोजे (सर्व रा. दैत्यनांदूर, ता- पाथर्डी) यांनी सरपंच संजय बाबासाहेब दहीफळे व गणेश रमेश दहीफळे यांना लाकडी दांडके व कुऱ्हाडीने मारहाण करुन संजय बाबासाहेब दहीफळे (वय- ५२ वर्षे) याची हत्या केली. गणेश रमेश दहीफळे यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन साक्षीदार ज्ञानेश्वर अशोक दहीफळे यास जखमी केले.

सदर घटनेबाबत फिर्यादी गणेश रमेश दहीफळे (वय- ३० वर्षे, धंदा- शेती, रा. दैत्य नांदूर, ता- पाथर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पाथर्डी पो.स्टे. ला गुरनं. ६९७/२०१९, भादवि कलम ३०२, ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५, ७ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) १३५ अन्वये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची वेगवेगळी पथके तयार करुन आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या. पथकातील पोसई/गणेश इंगळे, पोहेकॉ/विजय वेठेकर, रविन्द्र कर्डीले, मन्सूर सय्यद, आण्णा पवार, संदीप घोडके, सागर गवांदे, रणजित जाधव, रोहीदास नवगीरे, रोहीत मिसाळ, कमलेश पाथरुट, राहुल.सोळंके, दत्तात्रय गव्हाणे, शिवाजी ढाकणे, सचिन आडबल, सागर ससाणे, सागर सुलाने, रवि सोनटक्के, विनोद मासाळकर, विजय धनेधर, देवेन्द्र शेलार, जालिंदर माने, चालक संभाजी कोतकर, बाळासाहेब भोपळे अशांनी मिळून पाथर्डी व अहमदनगर येथे गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवून तिघांना अहमदनगर येथून ताब्यात घेतले. आरोपींना पाथर्डी पो.स्टे. ला हजर केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/