सांगली, मिरजेत 4 अट्टल चोरट्यांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – कुपवाड, मिरज शहरात चोऱ्या करणाऱ्या 4 अट्टल चोरट्यांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत कुपवाड, मिरजेतील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बापू मिलिंद काळे (वय 25, रा. वाल्मिकी आवास योजना, सांगली), श्रीशैल्य राम राजमाने (वय 26), अनिस अल्ताफ सौदागर (वय 23, दोघेही रा. सुभाषनगर, मिरज), शिवाजी जगन्नाथ मासाळ (वय 35, रा. सलगरे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी कुपवाड येथे एका रात्रीत 11 दुकाने फोडण्यात आली होती. त्यामुळे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना पकडण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. त्यानुसार शाखेच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी तपासासाठी विविध पथके तयार केली होती.

सांगलीतील वाल्मिकी आवास योजना परिसरात बापू काळे संशयास्पद रित्या फिरत होता. तो रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याने पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने कुपवाड येथील 11 दुकाने फोडल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिरजेतील सराफ कट्टा परिसरात श्रीशैल्य राजमाने, अनिस सौदागर फिरत होते. पथकाला त्यांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी सराफी दुकान फोडल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दागिने, रोकड असा 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान बुधवारी रात्री ऑल आऊट ऑपरेशन वेळी शिवाजी मासाळ विना नंबर प्लेटची दुचाकी घेऊन जाताना सापडला. त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केल्यानंतर त्याने ती दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सागर पाटील, अमित परीट, साईनाथ ठाकूर, निलेश कदम, विशाल भिसे, शशिकांत जाधव, बिरोबा नरळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी