पुणे / मावळ : वाढदिवसालाच सराईत गुन्हेगाराला सोमटणे फाटा इथं ठोकल्या बेड्या, 3 पिस्तूलासह 6 काडतुसं जप्त

पुणे/मावळ : पोलीसनामा ऑनलाइन –   पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलीसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई पुणे-मुंबई महामार्गावर सोमाटणे फाटा येथे करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सराईत गुन्हेगाराकडून 3 पिस्तूल आणि 6 राऊंड जप्त करण्यात आली आहेत. सचिन जाधव असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस अधिकारी राम गोमारे आणि कर्मचारी दत्तात्रय बनसूडे यांना बातमीदारकडून माहिती मिळाली. तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे- मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा येथे एक सराईत गुन्हेगार पिस्तूलाची विक्री करण्यासाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे युनिट पाचच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सोमाटणे फाटा येथे सापळा रचला. त्यावेळी एक संसशयीत तरूण आढळून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली.
पोलिसांनी या तरूणाची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 1 लाख 60 हजार रुपये किंमतीच्या तीन गावठी पिस्तूल आणि सहा राऊंड आढळून आले. परराज्यातून विक्रीसाठी त्याने तळेगाव येथे तीन पिस्तूल विक्रीसाठी आणल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. सचिन जाधव हा सराईत गुन्हेगार असून सांगली पोलीस ठाण्यात त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी सचिन जाधव याचा आज वाढदिवस होता. वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी त्याने तीन पिस्तूल विक्रीसाठी तळेगाव येथे आला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like