५०० रुपयांची लाच घेताना पोलीस अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन – तत्कालीन पोलीस निरीक्षकांना २० हजार रुपये देण्याच्या बहाण्याने पुणे राज्य राखीव पोलीस गट क्रमांक १ च्या शिपायाकडून ५०० रुपयाची लाच स्विकाराताना पोलीस उपनिरीक्षकास गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. प्रभाकर अनंत अंडागडे असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील राज्य राखीव दल गट क्रमांक -१ ची तुकडी गोंदिया येथील नक्षलग्रस्त भागात आली असून ही तुकडी २२ जून रोजी गोंदिया मुख्यालयात हजर झाली आहे. नक्षलग्रस्त भागात जाण्याअगोदर जवानांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणादरम्यान पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर अंडागडे याने तुकडीलील शिपायांना गोंदिया जिल्ह्यात आपली ड्युटी लागल्यामुळे आपल्याला प्रत्साहन भत्ता मिळत असल्याचे सांगितले. तसेच सुट्टीवर जाणे-येणे सोईस्कर होत असल्याचे सांगितले. या ठिकाणी आपली ड्युटी लावण्यासाठी तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी प्रयत्न केले असून त्यासाठी त्यांना २० हजार रुपये देयचे आहेत. त्यासाठी त्याने प्रत्येकाकडून त्याने ५०० रुपयांची लाच मागितली.

एका शिपायाने याची तक्रार गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता प्रभाकर अंडागडे याने शिपायाकडे ५०० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. आज दुपारी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात पथकाने सापळा रचून प्रभाकर याला शिपायाकडून पाचशे रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,राजेश दुदलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे,पोलीस निरीक्षक शशीकांत पाटील, पोलीस हवालदार प्रदीप तुळसकर,राजेश शेंद्रे, नायक पोलीस शिपाई रंजीत बिसेन, दिगंबर जाधव, नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, वंदना बिसेन, गीता खोब्रागडे, देवानंद मारबते यांनी केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

बाळासाहेब आंबेडकर यांची मुंबईत आज पत्रकार परिषद ,विधानसभेबाबत करणार मोठा खुलासा

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती