पंढरपूर : तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाला खंडणी प्रकरणी पोलिसांनी रंगेहाथ पकडलं !

पंढरपूर (सोलापूर) : पोलीसनामा ऑनलाईन –   जातिवाचक केस करण्याची धमकी देऊन एका चालकाकडून 10 हजार रुपयांची खंडणी वसूल करणऱ्या तालुक्यातील एका तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाला आणि एका तोतया पत्रकाराला पोलिसांनी रेड हँडेड पकडलं आहे.

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येतील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तानाजी लक्ष्मण कांबळे, पांडुरंग अहिलाजी शेळके, ज्योतीराम भानुदास कांबळे (रा. भटुंबरे) यांना पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रकांत सदाशिव आवटे (रा. लक्ष्मी टाकळी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती.

समोर आलेल्या माहितीनुसार, 2018 पासून संशयित आरोपी हे फिर्यादी चंद्रकांत आवटे यांना खंडणी मागून ब्लॅकमेल करत होते. तुझ्यावर खोट्या जातिवाचक केसेस करतो. तात्पुरते 10 हजार रुपये दे असं म्हणून ते कायम मानसिक त्रास देत होते.

या त्रासाला कंटाळून फिर्यादीनं पोलिसात धाव घेत तिथलेच उविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. त्या अर्जाची चौकशी सुरू असतानाच शुक्रवारी (दि. 18 डिसेंबर) पुन्हा आरोपी कांबळे आणि त्याचे साथीदार फिर्यादीस धमकी देऊन खंडणीची रक्कम मागत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी लेगचच स्टेशन रोडवरील एका हॉटेलात बसलेल्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी 10 हजारांपैकी 7 हजार रुपयांची रोख खंडणी घेताना आरोपींना रंगेहाथ पकडलं.

पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात 384, 385, 388, 389 आणि 34 या कलमांअतर्गत आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मगदुम हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.