‘अ‍ॅक्टिंग’ शिकण्यासाठी गेली मुलगी, सुप्रसिध्द सिनेनिर्मात्यानं केले ‘लैंगिक’ अत्याचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोलकात्यामध्ये आपल्या सहकारी विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका प्रसिद्ध सिनेनिर्मात्याला अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती या विद्यार्थिनीने दिल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिने केलेल्या आरोपानुसार ती त्याच्याकडे अभिनय शिकण्यासाठी जात असे. मात्र यादरम्यान त्याने अनेकवेळा तिच्यावर बलात्कार केला. डिसेंबर महिन्यापासून त्याने आतापर्यंत अनेक वेळा बलात्कार केल्याचा तिने आरोप केला आहे. त्यानंतर आता पीडितेने पोलिसांमध्ये या संदर्भात गुन्हा नोंदविला असून पोलिसांनी आरोपी फूलबागान याला त्याच्या घरातून अटक केली आहे. चौकशीच्या दरम्यान त्याने आपला गुन्हा काबुल केला आहे.

दरम्यान, त्याने आणखी एका महिला सहकाऱ्यावर बलात्कार केल्याची माहिती मिळत असून पोलिसांनी त्याचा तपास सुरु असल्याची माहिती दिली आहे.

Loading...
You might also like