कॉलेज तरुणीवर पाच जणांचा सामुहिक बलात्कार ; व्हिडीओ व्हायरल

मंगळुरू : वृत्तसंस्था – एका कॉलेज विद्यार्थिनीवर पाच जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कर्नाटकातील मंगळुरुतल्या पुत्तुर जिल्ह्यातील एका प्रतिष्ठित महाविद्यालयातील पाच तरुणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या मुलांकडे अत्याचार करतानाचा व्हिडीओ असून पोलिसांनी तो जप्त केला आहे. याच व्हिडीओच्या माध्यमातून आरोपी पीडित मुलीला ब्लॅकमेल करत होते. घटना घडल्यानंतर चार महिन्यांनी आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पीडीत मुलीवर लैंगिक अत्याचार करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार फेब्रुवारी महिन्याला असून आरोपी आणि पीडित मुलगी एकाच कॉलेजमध्ये शिकत असल्याचे मुलीने दिलेल्या जबाबात सांगितले आहे. घटनेच्या दिवशी सुनिल नावाच्या मुलाने तिला भेटण्यासाठी बोलावून घेतले. त्यानंतर सुनिल आणि त्याच्या इतर चार मित्रांनी मुलीचे अपहरण करून एका निळ्या रंगाच्या गाडीत घालून घेऊन गेले.

आरोपींनी एका निर्जनस्थळी नेऊन पीडित मुलीवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले. लैंगिक अत्याचार करत असाताना त्यांनी त्याचा व्हिडीओ काढला. व्हिडीओच्या आधारे ते तिला ब्लॅकमेल करीत होते. आरोपींनी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर कन्नड जिल्ह्यातील पोलिसांनी व्हायरल व्हिडीओवरून गुन्हा नोंदवला. गुन्हा पुत्तुल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली असल्याचे पोलीस अधीक्षक बी.एम. लक्ष्मी यांनी सांगितले. आरोपींवर भारतीय दंड संहिता, अॅट्रॉसिटी कायदा व आयटी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रंगांचा मानवी जीवनावर पडतो सखोल प्रभाव, जाणून घ्या सत्य

तुम्हाला नखे कुरतडण्याची सवय आहे का ? मग हे नक्की वाचा

आता स्वतःहूनच नष्ट होतील ‘कर्करोगाच्या’ पेशी

प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री होण्यासाठी महाराष्ट्रात पोषक वातावरण – नामदेवराव जाधव

वंचित बहुजन आघाडीला खिंडार, लक्ष्मण मानेंनी केले गंभीर आरोप