अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या पोलिसाला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शेजारी राहणाऱ्या चार वर्षाच्या मुलीला चॉकलेटच्या बहाण्याने घरात बोलावून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एका पोलीस कॉंस्टेबलला वडाळा पोलिसांनी अटक केली आहे. संजय वाघमोडे (वय ३५) असे त्याचे नाव आहे.

ताडदेव येथे एल ए ३ विभागात वाघमोडे काम करीत आहे. वडाळा येथील इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या संजय वाघमोडे याने तीन चार दिवसांपूर्वी घरात कोणी नसताना शेजारी राहणाऱ्या एका मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात बोलावले. मुलगी घरात जाताच संजयने तिच्याशी अश्लिल कृत्य केले. हा प्रकार मुलीने तिच्या मोठ्या भावाला सांगितला. भावाने हे आईला सांगितल्यावर त्यांनी वडाळा पोलिसांकडे धाव घेतली.

आईने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी वाघमोडेविरुद्ध पोस्को अन्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. संजयने याआधी देखील एका महिलेचा विनयभंग केल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. वाघमोडे याने यापूर्वी एका महिलेचा विनयभंग केला होता.

आरोग्यविषयक वृत्त-

तुमचे आरोग्य कसे आहे ? याचे उत्तर देईल तुमची जीभ

हॉटेलमधील “फिंगर बाऊलमध्ये” हात धुणे चुकीचे हे आहेत त्याचे दुष्परिणाम

लहान मुलांनाही शिकवा हि “योगासन” होतील फायदे

वेळ नसेल तर … फिटनेससाठी सूर्यनमस्कारही पुरेसे

सिने जगत-

मोगॅम्बो खुश हुवा ! गुगलचे ‘डुडल’ द्वारे खल’नायक’ अमरीश पुरी यांना अभिवादन

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा