दिवसा लग्‍न केल्यानंतर रात्री पळून जात होती ‘नवरी’, अनेक वेळा शिक्षा झाल्यानंतर समजला ‘हा’ धक्‍कादायक प्रकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था-  मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात महिलांच्या खरेदीचे प्रकार बर्‍याचदा समोर आले आहेत. खिलचीपुरच्या तड़तड़ा गावात असाच एक प्रकार घडला आहे. येथील मंगू सिंह ने दलालाच्या माध्यमातून भोपाळच्या पायल ठाकुर सोबत कोर्टात जाऊन लग्न केले. लग्नाच्या पहिल्याच दिवशी नवरी झालेली पायल ठाकूर ने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि विषय थेट पोलीस स्टेशनमध्ये गेला.

पोलिसांनी पायलची चौकशी करताच पायलने आपले लग्न आधीच झाल्याचे सांगत आपल्याला एक मुलगा असल्याचे सांगितले ताईच दलालाने पैशांसाठी आपले लग्न याठिकाणी लावल्याचे स्पष्ट केले तसेच या आधीही दलालाने पैशांसाठी तिचे लग्न अनेक ठिकाणी लावल्याचे समोर आले आहे.

खिलचीपुर एसडीओपी निशा रेड्डी यांनी या गँगचा पर्दाफाश केला आहे त्यांनी सांगितले की, आरोपी मीनू रायसेन, रायसिंह तंवर धनवास थाना कालीपीठ, मांगीबाई ब्यावरा को यांना कलम 420 अन्वये फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे.तर राहुल मिश्रा भोपाल, राधेश्याम सोनी बोड़ा नावाचे आरोपी अद्याप फरार आहेत.

मंगू सिंह यांनी सांगितले की पत्नीच्या मृत्यूनंतर लग्न करण्यासाठी दलालाने त्याला पायल ठाकूर यांच्याशी भेटवले आणि पाच हजार रुपये घेतले त्यानंतर राहुल मिश्रा, राधेश्याम सोनी, रायसिंह तंवर यांनी कोर्टात लग्न खर्चासाठी एक लाख रुपये घेतले आणि माझे कोर्टात लग्न लावले. लग्नाच्या पहिल्याच दिवशी नवरीने पळण्याचा प्रयत्न करताच मंगू आणि इतर ग्रामस्थांनी पोलिसांना पाचारण केले. असे प्रकार याठिकाणी अनेकदा घडत असतात पैसे देऊन अनेकदा मुली लग्नासाठी दुसऱ्यांना दिल्या जातात. काही थांबतात तर काही पहिल्या दुसऱ्या दिवशीच निघून जातात.जिल्ह्यात खिलचीपुर येथे घडलेले दुसरे प्रकरण आहे.

You might also like