RSS कार्यकर्ता आणि त्याच्या परिवाराची हत्या, मुख्य आरोपी अटकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये आरएसएस कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुर्शिदाबादमधून मुख्य आरोपीला अटक केली आहे. उत्पल बेहरा असे या आरोपीचे नाव असून त्याने या कार्यकर्त्यासह त्याची पत्नी आणि मुलाची देखील हत्या केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसापूर्वी मुर्शिदाबादमध्ये राहणाऱ्या 35 वर्षीय शिक्षकाची, त्याच्या गर्भवती पत्नीची आणि 8 वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, बेहरा याने मृत पाल यांना 2 पॉलिसीचे पैसे दिले होते. त्यातील एका पॉलिसीची पावती त्याला मिळाली होती. मात्र दुसरी पावती न मिळाल्याने मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु होता. त्यामुळे बोहरा याने त्यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. पाल यांनी त्याचा अपमान केल्याने त्याने हत्या केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून मृत शिक्षक हा आरएसएसचा कार्यकर्ता असल्याने त्याला राजकीय रंग देण्यात आला होता.

दरम्यान, या प्रकरणी मोठे राजकारण होत एकमेकांवर आरोप देखील करण्यात आले होते. त्याचबरोबर यामागे ममता बॅनर्जी यांचा हात असल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. त्याचबरोबर या प्रकरणाला अतिशय संवेदनशील देखील बनवण्यात आले होते.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी