जेजुरी पोलिसांकडून इलेक्ट्रिक मोटारीचे केबल चोरणारे अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी येथील युवराज रमेश शेंडकर व इतर ६ ते ८ शेतकरी यांच्या इलेक्ट्रिक मोटारीच्या तांब्याच्या केबल दि. १७/०७/२०१९ च्या रात्री चोरील्या गेल्या होत्या. एकाच रात्री इतक्या शेतकऱ्यांच्या केबल चोरीस गेल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. सदरची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनला देण्यात आली आणि जेजुरी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून दोन संशयित इसमाना ताब्यात घेतले.

पिंपळेचा मळा ओढयावर लावलेल्या इलेक्र्टीक मोटारीच्या तांब्याच्या केबल १) विशाल दत्तात्रय शेंडकर २) सचिन काळुराम शेंडकर यांनी चोरल्याचे कबुल केले. सदरचा गुन्हा कबुल केल्याने त्यांना अटक करून पोलीस कस्टडी मध्ये असताना चोरलेल्या तांब्याच्या तारा व इलेक्ट्रिक मोटरचे साहीत्य भंगार व्यवसाईक मंहमद अजीम अब्दुल जब्बार खान रा.नायगाव, ता.पुरंदर, जि.पुणे याने विकत घेतल्याने त्यास ही सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ४२,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरचा तपास मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या सूचना व मार्गदर्शनुसार पोलीस कर्मचारी सचिन पड्याळ जेजुरी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like