बँक अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या मनसे उपाध्यक्षाला अटक

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – शेतकऱ्यांचा आर्थिक छळ केला जात असल्याच्या कारणावरुन
सहारा बँकेच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी वणी पोलिसांनी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्यासह सहा कार्यकर्त्यांना शुक्रवारी सकाळी अटक केली.

मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. त्याचे माती रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतापलेल्या आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर बादलीतून चिखल ओतला होता. याप्रकरणी व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नितेश राणे व इतरांना अटक करण्यात आली होती. त्याचप्रमाणे या प्रकरणात मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर हा प्रकार समोर आला होता.

ठेवीदार शेतकऱ्यांचा बँकेकडून आर्थिक छळ केला जात असल्याच्या मुद्यावरून बुधवारी दुपारी राजू उंबरकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी येथील नागपूर रोड़ असलेल्या सहारा बँकेच्या शाखेत जाऊन राडा केला होता. उंबरकर व इतरांनी तेथील बँक अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना धमकावित मारहाण केली होती. मात्र, याप्रकरणी बँक अधिकाऱ्यांनी चुप्पी साधली होती. पोलिसांकडे कोणीही तक्रार न दिल्याने त्यांनीही कोणतीही कारवाई केली नाही. गुरुवारी सायंकाळी बँक अधिकाऱ्यांना मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाला. त्याची वणीसह परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली़. त्यानंतर वणी पोलिसांनी बँक अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. तेव्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानंतर आज सकाळी पोलिसांनी राजू उंबरकर व त्यांच्या ६ कार्यकर्त्यांना अटक केली. या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

व्हिटॅमीन ‘ई’ च्या कमतरतेमुळे येऊ शकते ‘अकाली वृद्धत्व’

अ‍ॅसिडिटीचा त्रास होतोय का ? करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

रक्तदान केल्याने ‘या’ आजारांपासून दूर रहाणे आहे शक्य

‘पबजी’च्या वेडापायी अभियंत्याची गोळी झाडून घेऊन आत्महत्या

घुसमट झाल्यामुळेच ‘वंचित’ मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला : लक्ष्मण माने

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like