जबाब देण्यासाठी ठाण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या पोलिसाला बेड्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस ठाण्यात जबाब देण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला पोलिसांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे.यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

चेतन दिलीप घाटगे (वय ३४, रा. मंडलिक पार्क, कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याप्रकऱणी त्याच्याविरोधात पोस्कोअनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकार ?
५ मे रोजी एका १४ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकऱणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ती मुलगी १४ मेला परत आली. त्यानंतर ती राजारामपुरी पोलीस ठाण्यात हजर झाली. त्यावेळी तिचा जबाब घेण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र या प्रकरणाच्या तपासी अंमलदार मिनाक्षी माळी या सुट्टीवर होत्या. त्यामुळे मुलीच्या पालकांना बोलवून घ्या ते नाही आले तर तिला बालसुधारगृहात पाठविण्याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. महिला पोलीस हवालदार आणि पोलीस नाईक चेतन दिलीप पाटील यांनी तिचा जबाब घेतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिची आरोग्य तपासणी केली. मात्र त्यने जबाब घेताना आपलाशी लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केल्याचा आरोप मुलीने केला. त्यानंतर तिच्या आईने यासंदर्भात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर त्याची शहानिशा पोलीस उपअधिक्षक प्रेरणा कट्टे यांनी केली. याप्रकरणी गुरुवारी घाटगे याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर त्याला पहाटे अटक करण्यात आली.

त्याला अंतर्गत वादातून गोवल्याची चर्चाही सुरु आहे. दरम्यान याप्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल असे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितले.

You might also like