सराफावर चॉपर, कोयत्याने वार करून ऐवज लुटणारा १९ वर्षानंतर अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सराफी व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरची पुड टाकून चॉपर आणि कोयत्याने वार करून १ लाख ८६ हजार ८५० रूपयाचा ऐवज जबरदस्तीने लुटणाऱ्याला तब्बल १९ वर्षानंतर अटक करण्यात आली आहे. अनेक वर्षापासुन फरार असलेल्या गुन्हेगाराला पुण्याच्या गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकाने अटक केली आहे.

राजु जगन्नाथ गायकवाड (४५, रा. मुपो. दिवे, ता. पुरंदर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट-१ मधील पोलिस कर्मचारी अमोल पवार यांना आरोपी राजु गायकवाड हा शंकर शेठ रोडवरील कनक हॉटेलच्या जवळ उभा असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली.

गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अरूण वायकर, उपनिरीक्षक हनुमंत शिंदे, कर्मचारी योगेश जगताप, अमोल पवार, वैभव स्वामी, अजय थोरात आणि अनिल घाडगे यांच्या पथकाने त्याला सापळा रचुन अटक केली आहे. आरोपी गायकवाडने सराफी व्यावसायिक इंदरमल जैन (४२, रा. परळ, मुंबई) यांना दि. २२ मार्च २००० रोजी ताराचंद हॉस्पीटलसमोर जबरदस्तीने लुटले होते.

आरोग्यविषयक वृत्त –