माजी महापौरांसह अनेकांना गंडा घालणारा गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

जमनीची बनावट कागदपत्रे तयार करुन खरेदीदाराकडून पैसे घेऊन अनेकांना गंडा घालणाऱ्याच्या डेक्कन पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या आरोपीने पुण्याच्या माजी महापौरांसह अनेकांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. त्याच्याविरुद्ध समर्थ, शिवाजीनगर, अलंकार, डेक्कन अशा पोलीस ठाण्यात फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत. मागील अनेक वर्षापासून पुणे पोलीस त्याच्या मागावर होते मात्र तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’723139b6-ccac-11e8-b523-a5571d620047′]

आशिष काळुराम गोयरे (वय४१, रा़ शंकर महाराज मठाजवळ, हडपसर) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणात इंद्रनिल गजमुले यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. डेक्कन पोलिसांनी त्याला अशाच एका प्रकरणात २००७ मध्ये अटक केली होती. आरोपीने माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांच्यासह अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.

इंद्रनिल गजमुले यांची हिंजवडी येथे २० गुंठे जमीन आहे. या जमिनीची आशिष याने २०१७ मध्ये बनावट विसार पावती बनविली. या पावतीच्या आधारे गोयरे याने गजमुले यांची जागा लता केरकर, समीर केरकर, केतन केरकर यांना विकण्याचा घाट घातला. त्यासाठी त्यांना वृत्तपत्रात जाहिरात देण्यास लावली होती. ही जाहिरात इंद्रनिल यांनी पाहिली. त्यानंतर त्यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात गोयरे विरुद्ध फिर्याद दिली होती. तेव्हापासून आरोपी फरार होता. डेक्कन पोलिसांसह गुन्हा दाखल असलेल्या पोलीस ठाण्यातील पोलीस त्याचा शोध घेत होते.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’781ae649-ccac-11e8-9f68-0b6dd3ba41ea’]

पोलिसांनी सांगितले की, आशिष गोयरे हा जागेची बनावट कागदपत्रे तयार करुन घेत होता. ही कागदपत्रे जागा खरेदी करणाऱ्यांना दाखवून त्यांच्याकडून इसार रक्कम घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक करत होता. अशीच फसवणूक माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांची केली होती. नवी पेठेतील एक जागा विकायची असल्याचे सांगून २०१४ मध्ये जागेची कागदपत्रे त्याने राजपाल यांना दाखवली. त्यांच्याकडून इसार घेऊन त्यांना जागा न विकता त्यांची फसवणूक केली होती.
[amazon_link asins=’B072SWSQ1F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7e5ebfb6-ccac-11e8-af12-ab4936c0b6a0′]

याप्रकरणी राजपाल यांनी आरोपीविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. याच प्रकारे त्याने अनेकांना गंडवले आहे. अलंकार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात त्याने ८५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. तर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड अधिक तपास करीत आहेत.