अहमदनगर : गोळीबार प्रकरणी गावठी कट्ट्यासह एकास अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील गोळीबार प्रकरणातील आरोपी भारत सोपान कापसे (वय-२३ वर्षे, रा-कांगोणी, ता-नेवासा) यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्या अंगझडतीत त्यांचे ताब्यात ३० हजार २०० रुपये किंमतीचे एक गावठी पिस्तूल व त्याचे मॅगझीन, एक जिवंत राऊंड मिळून आला आहे.

याबाबत माहिती अशी की, दि. १४/८/२०१९ रोजी सचिन गोरख कु-हाडे (वय-२७, धंदा-व्यापार, रा. धनगरगल्ली, घोडेगाव, ता. नेवासा) हे घोडेगाव येथे नगर- औरंगाबाद रोडवर हॉटेल गुडलकजवळ घोडेगाव गावात होते. त्यावेळी आरोपी कृष्णा यल्लाप्पा फुलमाळी व त्याचे साथीदारांनी कुऱ्हाडे यांच्यावर गावठी पिस्टलमधून गोळीबार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहन खंडागळे, पो.ना. मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, रविद्र कर्डीले, राम माळी, ज्ञानेश्वर शिंदे, योगेश सातपुते, संदिप दरंदले, रविकिरण सोनटक्के, दिपक शिंदे, मेघराज कोल्हे, सचिन कोळेकर असे आरोपीचा शोध घेत होते. या गुन्ह्यातील आरोपी भारत कापसे हा पांढरीपूल येथे येणार असल्याची गोपनिय माहिती मिळाली. पांढरीपूल शिवारात मिरी रोड येथे सापळा रचुन सदर इसमास पाठलाग करुन मोठया शिताफीने पकडून त्यास ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत त्यांचे ताब्यात ३०,२००/-रु किंमतीचे एक गावठी पिस्तुल व त्यांचे मॅगझील मध्ये एक जिवंत राऊंड मिळुन आले.

आरोग्यविषयक वृत्त –