भारत – वेस्टइंडिज क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणाऱ्यांचा पर्दाफाश ; पुण्यातील तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेतील भारत – वेस्ट इंडिज क्रिकेट सामना गुरुवारी सुरु असताना त्याचे बेटिंग घेणाऱ्या इमारतीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून तिघांना पकडले.

संदीप कन्हैयालाल जाजू (वय ४९, रा. सदाशिव पेठ), इमरान जाकीर कादरी (वय २७, रा. कात्रज), सागर बाबु माने (वय ३१, रा. जनवाडी, गोखलेनगर) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भवानी पेठेतील प्रेम चेंबर्स येथील तिसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेच्या सामन्याचे बेटिंग घेतले जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते व त्यांच्या पथकाने येथे छापा टाकला. तेथे बेटिंग घेणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. बेटिंग घेण्यासाठी एक लॅपटॉप, १० मोबाईल, टीव्ही कॉन्फरन्स कॉल मशीन व २४ हजार रुपयांची रोकड असा १ लाख १४ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. पुढील कारवाईसाठी तिघांना समर्थ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आरोग्यदायी जीवनासाठी नियमित दूध घ्यायलाच हवे
चांगल्या आरोग्यासाठी जीम मध्ये जाण्यास वेळ नसेल तर ‘हे’ करा
सावधान ! समुद्रात आंघोळ करणार असाल तर हे तुमच्यासाठीच आहे, जरूर वाचा
मेंदू च्या तंदुरुस्तीसाठी ‘खा’ हे पदार्थ