हातात कोयता घेऊन दहशत पसरविणारा गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सहकारनगर पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरु असताना तळजाई झोपडपट्टीमध्ये रात्री दोनच्या सुमारास हातात कोयता घेऊन दहशत पसरविणाऱ्या तरुणाला अटक केली.

उत्कर्ष बाळू चांदणे (२२, तळजाई वसाहत पद्मावती) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परिमंडल २ मध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबविले जात आहे. त्यानुसार सहकार नगर पोलिसांकडून पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिग ऑपरेशन सुरु होते.

त्यावेळी रेकॉर्डवरील गुन्हेगार उत्कर्ष बाळू चांदणे हा हातात कोयता घेऊन परिसरात दहशत पसरवित असताना पोलिसांना आढळून आला. त्यानंतर शस्त्रबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकऱणी त्याला अटक करण्यात आली. त्याच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.