२५ लाखाच्या फसवणूकप्रकरणी ‘त्या’ प्रसिध्द मालिकेतील ‘आबासाहेब’, त्यांच्या पत्नीला अटक, कोर्टात रवाना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकप्रिय मालिका तुझ्यात जीव रंगला मधील राणादाच्या आबासाहेबांची भूमिका साकारणारे कलाकार मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नीला औंध येथील पीएनजी ज्वेलर्सकडून २५ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने खरेदी करून पैसे न देता फसवणूक केल्याप्रकरणी चतुश्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, दास्ताने पती-पत्नींना शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. 21 जून पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

यासंदर्भात अक्षय श्रीकृष्ण गाडगीळ (३४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अभिनेता मिलिंद गणेश दास्ताने आणि त्यांच्या पत्नी सायली मिलिंद दास्ताने उर्फ सायली बालाजी पिसे (रा. तळजाई पठार, त्रिमुर्ती हाऊसिंग सोसायटी, धनकवडी) या दोघांना चतुश्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण ?
तक्रारदार हे औंध येथील पीएनजी ज्वेलर्समध्ये भागीदार आहे. मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नी गाडगीळ यांच्याकडे आले. आम्हाला मोठ्या प्रमाणावर सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने खरेदी करायचे असल्याचे अमिष त्यांनी दाखवले. मात्र आमची मुंबईतील एक प्रॉपर्टी विल्यानंतर ३ कोटी रुपये मिळाणार आहेत. ते मिळाल्यानंतर हे पैसे देऊ असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांना यावर लागणार असलेले व्याजही देऊ असे वचन दिले. आणि जवळपास २५ लाख ६९ हजार रुपये किंमतीचे १ किलो सोन्याचे दागिने त्यांनी खरेदी केले. गाडगीळ यांच्या ज्वेलर्स मध्ये काम करणारा मॅनेजर निलेश दास्ताने हा मिलिंद दास्ताने यांचा पुतण्या आहे. त्याने वेळेत पैसे घेऊन येण्याचे आश्वासन दिले.

त्यानंतर दाम्पत्य पुन्हा दागिने खरेदीसाठी दुकानात आले. त्यांनी ४ लाख ९२ हजार रुपये किंमतीचे दागिने खरेदी केले. त्यासाठी त्यांनी २ लाख ४४ हजार रुपयांचे २ चेक दिले. ते निलेश दास्ताने याने बँकेत जमा केले. मात्र ते वटले नाहीत.

आरोग्य विषयक वृत्त-
#YogyaDay 2019 : ‘सौंदर्य’ आणि ‘तारुण्य’ वाढविणारे नटराजन आसन
“ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय
” टाच ” दुखीमुळे त्रस्त असाल तर, जाणून घ्या टाच दुखीची कारणे आणि उपाय

Loading...
You might also like