मतदारांना पैसे वाटणाऱ्या दोघांना अटक, रोहित पवार यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – मतदारांना पैसे वाटणार्‍या दोघांना निवडणूक भरारी पथकाने रात्री उशिरा अटक केली आहे. अटक केलेले दोघेही राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप होत आहे. त्यांच्याकडे मतदान प्रतिनिधी असल्याचे प्राधिकृत पत्रही सापडले आहे.

आबासाहेब मधुकर सोनवळ (रा. टाकळी, ता. करमाळा) व किसन शिवाजी जाधव (रा. पारवडी, ता. बारामती) ही अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांकडे २० हजार रुपयांची रोकड, मतदान प्रतिनिधी म्हणून प्राधिकृत पत्र व मतदार यादी सापडली आहे. मतदारांना पैसे वाटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी व बाहेरील राजकीय व्यक्तींनी मतदारसंघात थांबू नये, या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर कलम 171 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शरद पवार यांचे नातू रोहित पवार व भाजपचे मंत्री राम शिंदे यांच्यात ही लढत होत आहे.

visit : Policenama.com

You might also like