६० हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

वैराग (सोलापूर) : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस कोठडी रिमांड न घेण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस नाईक महेश सतीश पवार (वय-३२) याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या करावाईमुळे ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. ही कारवाई आज (बुधवार) सकाळी दहाच्या सुमारास करण्यात आली.

महेश सतीश पवार हे बार्शी तालुक्यातील वैराग पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत. याप्रकरणी तक्रारदाराने सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मंगळवारी (दि.९) तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार याच्यावर वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याला पोलीस कोठडी रिमांड देण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा पोलीस कोठडी न घेण्यासाठी आणि गुन्ह्यात मदत करण्यासाठी महेश पवार याने तक्रारदाराकडे साठ हजार रुपायांची लाच मागितली. तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता पवार याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. आज सकाळी दहाच्या सुमारास पथकाने पोलीस ठाण्यात सापळा रचून महेश पवार याला तक्रारदाराकडून लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. महेश पवार याच्याविरुद्ध वैराग पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उप अधिक्षक अजितकुमार जाधव, पोलीस निरीक्षक कविता मुसळे व जगदीश भोपळे, सहायक पोलीस निरीक्षक निलकंठ जाधवर, पोलीस हवालदार चंद्रकांत पवार, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धाराम देशमुख, प्रफुल्ल जानराव, चालक शाम सुरवसे यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

कष्टाची कामे न करणाऱ्यांनी ‘लठ्ठपणा’ असा कमी करावा

‘या’ 5 प्रमुख कारणांमुळे हातापायांना ‘मुंग्या’ येतात, जाणून घ्या ‘उपाय’

‘स्पर्म काऊंट’ वाढवण्यासाठी मध आणि आवळा ‘रामबाण’ उपाय ; ‘असे’ करा सेवन !

जेवणानंतर ‘या’ गोष्टींचे सेवन कटाक्षाने टाळा ; अन्यथा …

अ‍ॅसिडीटीला मुळापासून संपवा, करा ‘हा’ नैसर्गिक उपाय

You might also like