बुलंद शहरामधील हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार गजाआड ; अन्य ३२ जणांना अटक 

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे झालेल्या हिंसाचारातील मुख्य सूत्रधार योगेश राज याला पोलिसांनी अटक केली आहे. हिंसाचार घटित झाल्यापासून आज तागायत योगेश हा मुख्य आरोपी फरार होता. स्याना हिंसाचार प्रकरणी आरोपी असलेल्या दोन अल्पवयीन मुलांनी न्यायालयासमोर शरणागती पत्करली आहे. त्या दोन मुलांना तुरुंगात पाठवून देण्यात आले आहे. बुलंद शहर हिंसाचारात आज तागायत ३२ आरोपी पकडले गेले असून त्यातील १३ आरोपी हे अल्पवयीन आहेत.

३ डिसेंबर २०१८ रोजी स्यान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंगरावठी चौकी भागात झालेल्या हिंसाचारात पोलीस निरिक्षक सुबोधकुमार यांची आरोपींच्या जमावाकडून गोळीबार करत आणि कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. तर याच हल्ल्यात आरोपी सुमित नावाच्या मुलाचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. या घटनेतील ३२ आरोपींना आता पर्यंत अटक करण्यात आली असून १२ अल्पवयीन आरोपी अद्याप फरार आहेत. असे एकूण ४४ आरोपी जमावाच्या टोळीने येऊन हिसाचार घडवून गेले होते.

बुलंद शहर हिंसाचारात आता पर्यंत ६० हुन अधिक लोकांची संशयित म्हणून अटक आणि त्यानंतर सुटका करण्यात आली आहे. या हिंसाचारात सहभागी असणारे दोन आरोपी न्यायालया समोर शरण आले. चांदपूर पुठीगावचा सतीश कुमार आणि महाब गावचा विनीत कुमार असे दोन आरोपी काल न्यायालयात शरण आले आहेत. या प्रकरणात फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके शर्थीचे पर्यंत करत आहेत. या प्रकरणातील फरार आरोपी लवकरच गजाआड करण्यात येतील असे  एसएसपी प्रकाश चौधरी यांनी म्हणले आहे. पोलिसांच्या दिवसा ढवळ्या हत्या होण्याचे प्रकार उत्तर प्रदेश साठी नवीन नाहीत. येथे अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शरीराची गोळ्यांनी चाळण केल्याचे प्रकार घडले आहेत. अशा उत्तर प्रदेश राज्यात क्राईम रेट जास्त असल्याने या राज्यात शांतता आणि सुरक्षा कायम राखणे हे राज्यकर्त्यांवर आणि पोलिसनासमोर मोठे आवाहन आहे.