दिवसा घरे फोडणाऱ्या सराईत टोळीच्या मुसक्या आवळल्या, नगर ‘एलसीबी’ची कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्ह्यात विविध ठिकाणी दिवसा घरे फोडणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांच्या पथकाने कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथून या टोळीतील तिघांना अटक केली आहे. दोन साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. त्यांनी नगर शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या अनेक गुन्ह्यांची कबुली दिली आहे. या टोळीकडून अनेक घरफोड्यांच्या उलगडा होणार आहे.

अटक केलेल्या चोरट्यांमध्ये युवराज अर्जुन ढोणे (रा.रासकर वस्ती, मिरजगाव, ता. कर्जत), जिवन नाना गिरगुणे (रा. श्रीरामनगर, मिरजगाव, ता.कर्जत), प्रकाश सुभाष पाटील (रा. वाकी, ता. आष्टी, जि. बीड) यांचा समावेश आहे. टोळीतील इतर सदस्य अविनाश अर्जुन ढोणे, अक्षय उर्फ आकाश बाजीराव गायकवाड हे फरार आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी, २६ मे रोजी राजेंद्र गंगाराम जोग (रा.आनंद एनक्लेव्ह, फ्लॅट नंबर.२०२, गायकवाड मळा, चिंतामणी हॉस्पिटल मागे, बालिकाश्रम रोड) यांच्या घरी दिवसा घरफोडी झाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना ही घरफोडी युवराज अर्जुन ढोणे व त्याचे साथीदारांसह मिळून केलेला आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाली. त्यावरून पवार यांच्या आदेशावरून स.पो.नि. संदिप पाटील, पो.हे.कॉ. दत्तात्रय हिंगडे, पो.ना. सुनिल चव्हाण, पो.ना. संदिप पवार, पो.ना. भागीनाथ पंचमुख, पो.ना. सुरेश माळी, पो.ना. दिपक शिंदे, पो.ना. रवि सोनटक्के, पो.ना. रविंद्र कर्डीले, पो.कॉ. मेघराज कोल्हे आदींच्या पथकाने सापळा लावून ताब्यात घेतले. गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पुन्हा त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांचे इतर साथीदार यांची नावे सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like