वायरल क्लिपप्रकरणी पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांची बदली

अकोले : पोलीसनामा ऑनलाइन – अकोले ( Akole) येथील वायरल क्लिप (Viral Clip) प्रकरणातील पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे (Arvind Jondhale) यांची अखेर बदली करण्यात आली. राजकीय दबाव वाढल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही बदली केली आहे. तसेच एका कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे.

मागच्या महिन्यात गोमास टेम्पोचा पाठलाग केल्यावरून पोलीस व्हॅनचालक व अरविंद जोंधळे यांच्यात झालेल्या संभाषणाची क्लिप वायरल झाली होती. चालकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने ही क्लिप माध्यमांना देऊन वायरल केली होती. त्यामध्ये अकोले पोलीस इन्स्पेक्टर आणि आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यातील संबंध बिघडल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे अरविंद जोंधळे यांच्या बदलीचा पाठपुरावा करण्यात आला.

तसेच पत्रकार राजेंद्र आंबरे, विजय पानसरे यांनी अरविंद जोंधळे यांच्या चौकशीची आणि बदलीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील शुक्रवारी रात्री संगमनेर पोलीस स्टेशनला पूर्वी कार्यरत असलेले अभय परमार यांची अकोले पोलीस स्टेशनला बदली करून अरविंद जोंधळे यांना कार्यमुक्त करण्यात आले.