काश्मीरमधील ‘ओसामा’ला महिला कमांडरनं केलं ठार, ऑपरेशनचा व्हिडिओ व्हायरल (व्हिडिओ)

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरच्या बटोतमध्ये शनिवारी ऐन नवरात्री उत्सवाच्या तोंडावर अतिरेकी हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. जम्मू काश्मीरच्या रामबनच्या बटोत भागात  शनिवारी काही दहशतवाद्यांनी एका घरात घुसून कुटुंबाला ओलीस धरले. वेळीच सुरक्षा दल तेथे दाखल झाले आणि परिसराला घेराव घालून ऑपरेशन सुरू केलं. सैनिकांनी त्या कुटुंबाची सुटका केली तसेच घरात घुसून 5 पैकी 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांना शरण येण्यासही सांगितलं होतं.
घरात घुसण्याआधी दहशतवाद्यांनी ग्रेनेडही फेकलं होतं. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

एका महिला कमांडरने आपल्या सैन्यासह ही कारवाई केली. या कारवाईत काश्मीरमधील ओसामा ठार झाला. या कारवाईचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हिडीओत दिसत आहे. महिला कमांडर ओसामाला शरण येण्यास सांगत आहे. आम्ही असताना तुला काळजी करण्याची गरज नाही. तुला कोणीही हात लावणार नाही असे म्हणत कमांडर त्याला अभय देत होत्या. यानंतर तेथून  नागरिकांची सुटका करत त्यांना बाहेर काढण्यात आले.

महिला कमांडरने ओसामाला 15 मिनिटांचा वेळ देण्यात दिला होता. व्हिडीओत दिसत आहे की, महिला कमांडर घरात लपलेल्या ओसामाला म्हणत आहे की, “ओसामा तुझं सर्वांशी बोलणं करून दिलं जाईल तू बाहेर ये.

Visit : Policenama.com