PSI महिला अधिकार्‍याशी Love मॅटर ?; पोलिस कर्मचार्‍यानं ठाण्याच्या टेरेसवरुन मारली उडी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी हद्दीतील एका पोलिस ठाण्यात शिपाई पदावर कार्यरत आहेत. त्यांचे याच पोलिस ठाण्यातील एका महिला उपनिरीक्षकाशी मागील दीड वर्षापासून प्रेमसंबंध आहेत. त्यांच्यात अंतर्गत वादविवाद सुरू होते. यातून चिडलेल्या निरवणे यांनी महिला पोलिस उपनिरीक्षकाला जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, महिला पोलिस उपनिरीक्षककाशी असलेल्या प्रेमसंबंधातून पोलिस शिपायाने पोलिस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना दिघी पोलिस ठाण्यात घडली.

सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास स्वतःच्याही जीवाचे बरे वाईट करुन घेईल अशी धमकी देत पोलिस ठाण्याच्या इमारतीच्या टेरेस वरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून अधिक तपास सुरू आहे.