पुणे : पोलीस ठाण्यात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

घरफोडीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीने पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना कोंढवा पोलीस ठाण्यातील तपासी पथकाच्या खोलीत सोमवारी (दि.२१) सायंकाळी साडेपाच वाजणेच्या सुमारास घडली. या घटनेत आरोपी जखमी झाला आहे.

रफीक हुसेन शेख (वय-२३ रा. भाग्योदयनगर, कोंढवा) असे या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आर.एच. शेख यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

आरोपी रफीक शेख याला घरफोडीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळी त्याची गुन्ह्यामध्ये चेहरेपट्टी घेत असताना त्याने आरडा-ओरडा करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी चेहरेपट्टी घेऊ नये तसेच गुन्ह्यामध्ये अटक करु नये यासाठी त्याने तपासी पथकाच्या रुममध्ये गोंधळ घातला. तपासी पथकाच्या रुममधील खिडकीच्या काचेला जोरात धडक मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.