Video : भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍याला पोलिसांकडून थर्ड डिग्री, अक्षरशः अंगावर काटा आणणारा Video Viral झाल्याने प्रचंड खळबळ; जालन्यातील धक्कादायक घटना

जालना : पोलीसनामा ऑनलाइन –  एका खासगी रूग्णालयात झालेल्या वादाचे व्हिडिओ शुटिंग केल्याच्या कारणावरून भाजप युवा मोर्चाच्या सरचिटणीसाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मारहाणीची घटना 9 एप्रिल रोजी घडली असून पदाधिकारी गयावया करत माफी मागत आहे. तर पोलिस त्यास काठ्या तुटेपर्यंत मारहाण करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान या प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून अमानुष मारहाणीबद्दल संताप व्यक्त केला आहे. कोरोना महामारीतही रोज स्त्रियांवर अत्याचार सुरू आहेत लोकांचे खुन होताहेत तिथे दाखवा खाकीचा ज़ोर…गोरगरीबांवर जोर काढून काय साध्य करताय असा सवाल त्यांनी पोलीस प्रशासनाला केला आहे. यानंतर त्यांनी दुसरे ट्विट करून, तो माणूस कुणीही असो, त्याने जर चुकीचे केले असेल तर गुन्हा दाखल करा. पण या पद्धतीने गुरांसारखे मारण्याचा पोलिसांना अधिकार नाही, असे म्हटले आहे.

शिवराज नारियलवाले (रा. जालना) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन म्हणाले की, 9 एप्रिल रोजी एका खासगी रूग्णालयात अपघात झालेल्या व्यक्ती मरण पावला होता. त्यानंतर काही तरूणांनी येऊन रूग्णालयाची तोडफोड केली होती. जमाव पागविण्यासाठी आम्ही लाठीचार्ज केला होता. विशेष म्हणजे, या व्हिडिओमध्ये काही दिवसांपूर्वीच दोन लाखांची लाच घेणारे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर दिसत आहे. शिवाय, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन व कर्मचारी दिसत आहेत.

 

Pune : खडकवासला डावा कालवा रस्ता कोंढवे-धावडे, शिवणे ते कोंढवा गेट (एनडीए प्रवेशद्वार) पर्यंत वाढवण्याचा मार्ग अखेर मोकळा; जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून रस्त्याला मंजूरी

तुळशीसह ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, फुफ्फुसे एकदम मजबुत अन् निरोगी बनतील, जाणून घ्या

गृह मंत्रालयानं कोरोनाच्या सध्याच्या गाइडलाइन्सला 30 जुनपर्यंत वाढवलं, राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना दिले ‘हे’ निर्देश

मुलांमध्ये कोविड-19 ची लक्षणे कशी ओळखावीत? जाणून घ्या घरी करू शकता का उपाचार?

Video : काठीने मारहाण करतानाचा पहेलवान सुशील कुमारचा व्हिडिओ आला समोर, सोशल मीडियावर होत आहे वायरल

Required Test After Isolation : आयसोलेशनच्या नंतर कोण-कोणत्या टेस्ट करणे आवश्यक, जाणून घ्या